मुंबई : महाराष्ट्रात सरकार बदललं आहे. राज्यात आता ठाकरे सरकारची सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या दरम्यान संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातून देशापर्यंत परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनत आहेत. य़ाचा अर्थ देशात परिवर्तनाची सुरुवात होत आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, अजित पवारांना देखील महाआघाडीत चांगलं स्थान मिळेल. ते खूप मोठं काम करुन आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सरकारस्थापनेबाबत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी म्हटलं की, भाजपकडून अघोरी प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्राच्या जनतेने सगळं उद्धवस्त केलं. संजय राऊत यांनी म्हटलं की, आता अशा प्रकारचे प्रयोग नाही चालणार आणि महाराष्ट्राचा परिणाम इतर राज्यांवर देखील पाहायला मिळेल.



संजय राऊत यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं मिशन आता पूर्ण झालं आहे. आमचं सूर्ययान मंत्रालयावर लँड झालं आहे. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा मला वेड्यात काढण्यात येत होतं. आगामी काळात दिल्लीत देखील आमचं सूर्ययान उतरलं तर आश्चर्य नाही वाटणार.


अजित पवार यांनी अचानक राष्ट्रवादीच्या आमदारांचं पत्र राज्यपालांना देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. काही आमदार राष्ट्रवादीतून फुटतील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. त्यानंतर ३ दिवसात हे सरकार कोसळलं. अजित पवारांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांना यश ही आलं.