मुंबई : पंढरपुरातील विधानसभा पोटनिवडणुकीतील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सूचक इशारा देणारं वक्तव्य केलं आहे, यात फडणवीस यांनी म्हटलं होतं, भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना तुम्ही निवडून द्या, सरकारचा पुढचा करेक्ट कार्यक्रम मी करतो. या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना म्हटलं आहे की, तुम्ही सरकार पाडण्याच्या दिवा स्वप्नातून बाहेर या, सरकार पडणार नाही. तुम्ही सरकार पाडण्याचा विचार सोडून द्या, असं संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.


''सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो''.


देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य आघाडी सरकारला सावध करणार आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांना तयार राहा असं सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना करताना म्हटले आहे, तुम्ही फक्त समाधान आवताडे यांना निवडून द्या, ''सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो''.


राज्याच्या राजकारणात लवकरच भूकंप?


देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य अशा वेळेस आलं आहे, ज्यावेळेस सरकार अडचणीत आहे, दुसरीकडे कोरोनाच्या बाबतीत सरकारसमोर आव्हान उभं असताना, तसेच त्यांच्या इतर मंत्र्यांवर आरोप होतील असे संकेत असताना हे वक्तव्य आल्याने, राज्याच्या राजकारणात लवकरच भूकंप होणार तर नाही ना, यावर चर्चा सुरू झाली आहे.


राष्ट्रवादीच्या आमदाराच्या निधनानंतर पोटनिवडणूक


पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झालं, यानंतर येथे विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीने भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.