मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्विटची परंपरा सुरूच आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्विट करून काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ट्विट आणि पत्रकार परिषदेतून राजकीय रणनीति ठरवली. याचा परिणाम आपण पाहतोच. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन अवघे दोन दिवस झालेत. सरकार स्थिरावत असताना संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करून आपली भावना व्यक्त करत आहेत. मजबूत होने का मजा.. ही तब है, जब सारी दुनिया... कमजोर करने पर तुली.... हो....  हा शेर ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. 


 



संजय राऊत यांनी आतापर्यंत सरकार स्थापनेत खूप महत्वाची भूमिका साकारली आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याचे थांबविले. विधानसभेच अधिवेशन शनिवारपासूनच सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी भाजपने 2 तासातच आपला विरोध दर्शवून सभेतून काढता पाय घेतला. यामुळे भाजपवर जोरदार टिका देखील झाली. 


यावरून संजय राऊत यांच ट्विट सुचक असल्याचं कळतं. मजबूत होने का मजा.. ही तब है, जब सारी दुनिया... कमजोर करने पर तुली.... हो.... सरकारला विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध असेल तेव्हाच सरकार अधिक चांगल कार्यक्षम होणार असल्याचं या टविटमधून सुचवलं आहे. जेव्हा सगळेजण टिका करून परिस्थिती कमजोर करण्याचा प्रयत्न करतील तेव्हाच मजबूत होण्यात खरी मजा असणार असल्याचं म्हटलं आहे.