संजय राऊत यांचा इशारा; `आयटीची भानामती, आम्ही रेड टाकणार आणि घुसणार`
Sanjay Raut`s press conference in Mumbai : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबईत धाडीवर धाडी पडतात. त्यामुळे आम्ही ठरवले आहे. आम्ही देखील एक रेड टाकणार आहोत. आम्ही घुसणार आहोत.
मुंबई : Sanjay Raut's press conference in Mumbai : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबईत धाडीवर धाडी पडतात. त्यामुळे आम्ही ठरवले आहे. आम्ही देखील एक रेड टाकणार आहोत. आम्ही घुसणार आहोत. बीएमसी निवडणूक होत नाही तोपर्यंत प्रत्येक वार्डमध्ये रेड होणार आहे, असे संकेत संजय राऊत यांनी दिलेत. आम्हालाही धाड टाकण्याचा अधिकार आहे. आज आयटीची भानामती सुरु आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर धाड टाकण्यात येत आहे, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut press conference on ED and IT raid in Mumbai)
शिवसेना भवनच्या 5 व्या माळ्यावर संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेतली. मागील पत्रकार परिषदेच्या वेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते, मात्र आता तसे चित्र दिसून आले नाही. राऊत म्हणाले, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये ठराविक लोक यांचे टार्गेट का आहेत. प्रत्येक वार्ड, शाखेवर धाडी पडतील. आम्ही ईडीकडे तक्रार दिली. मात्र, त्याचे काय झाले. संपूर्ण देशात ईडीची कारवाई ही महाराष्ट्रात झाली आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे एक षडयंत्र आहे. ईडी आणि आयकरला आम्ही आजवर 50 नावं दिली पण त्यांनी चौकशी केली नाही.
ईडीचे 5 एजंट वसुली करतायेत - राऊत
ईडी भारतीय जनता पार्टीची एटीएम मशीन बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 28 फेब्रुवारीला पत्र दिले आहे. नोयडामधून मलबार हिलमध्ये स्थित झालेला व्यक्ती 6 हजार कोटी संपती कशी झाली ट्रायडन ग्रुप मोठा कसा झाला हे सांगा? आयकर रेडची भानामती भुताटकी कोण करतंय याची पोलखोल शिवसेना करणार आहे. ईडीचे चार वसुली एजंट आणि 1 किरीट सोमय्या असे 5 ईडीचे एजंट आहेत. ईडीचेअधिकारी 50 हजार कोटी रुपये खर्च करून उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढत आहेत. ईडीचे काही अधिकारी आणि एजंट , कार्पोरेट बिल्डर यांना धमकावत आहेत, असे आरोप संजय राऊत यांनी यावेळी केलेत.
राऊत म्हणाले, कोण आहे हा नवलानी?
ज्या ईडीला तुम्ही राजकीय विरोधकांच्या मागे लावली आहे. ईडीचे लोक बिल्डर डेव्हलपर यांना घाबरते. पैसे लुबाडले जातात ही माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. जितेंद्र नवलानी याने 100हून अधिक बिल्डर डेव्हलपर यांच्या कडून धमकावून पैसे लुबाडले. नवलानी हे इडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. 2017 मध्ये ईडीने दिवान हाऊसिंग सोसायटीची चौकशी केली. तेव्हा नवलानी यांनी 10 कोटी यांना 7 कंपनीत भोसले यांनी पैसे पाठवले. जितेंद्र नावलानी कोण, त्याचा काय संबंध , किरीट सोमय्या यांच्याशी काय संबंध आहेत, असे सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केले.