मुंबई : मला आणि अजित पवारांना  (Ajit Pawar) ईडी (ED)ची नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही. आम्ही चौकशांना घाबरत नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.  ज्याप्रकारे तपास सुरू आहे. त्या कुटुंबाचा काही संबंध नाही. मराठी माणसाने व्यापार करू नये जर केला तर ईडीच्या माध्यमातून तुम्हाला खतम करू असं धोरण असेल तर मराठी माणूस छाताडावर उभा राहील असे राऊत म्हणाले. माझ्याकडे आणि महाविकास आघाडीकडे ईडीवाले येऊ शकतात. त्यांना येऊ द्या. आम्ही वाट पाहतो आहोत असे राऊत म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देशात आणखी काही काम नसतील. लोक घोटाळे करून पळत आहेत.. काही जणांच्या संपत्तीत अचानक वाढ होते पण, राज्यात काही लोकांवर ईडी दबाव टाकत आहेत. त्यांना ते करू द्या असा टोला राऊतांनी लगावला.


मीच ईडीला १०० जणांची लिस्ट पाठवीन तेव्हा बघतो कोण किती कारवाई करतो. आम्ही चौकशीला घाबरत नाही. आता चौकशीला तुम्ही घाबरला पाहिजे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. हे देखील विसरू नका असे राऊत म्हणाले. 



जुनी थडगी उकरण्याचं काम चालू असल्याची मला माहिती मिळाली आहे.. त्यांना चौकशी करू द्या. ईडी मोहेंजोदडो हडप्पापर्यंत पोहोचलेयत असे राऊत म्हणाले.


'काँग्रेसचा प्रमुख स्तंभ कोसळला'


अहमद पटेल यांचं निधन झालं हे फार धक्कादायक असून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांशी बोलले होते असे राऊत म्हणाले. देशाच्या राजकारणात आज त्यांची गरज होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचा प्रमुख स्तंभ कोसळला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन व्हावं म्हणून त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. अमित शहा आणि नांरेंद्र मोदी हे आज प्रधानमंत्री आणि गृहमंत्री झाले मात्र गेले कित्येक वर्षे गुजरातच्या राजकारणावर पटेल यांनी पकड होती असेही राऊत म्हणाले.