मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) विधानभवनात उपस्थित होते. तसंच शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी यावेळी हजेरी लावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी सहा पैकी 4 जागा निवडून आणणारच असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसंच शिवसेना कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही, भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी विजय आमचाच आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


संभाजीराजे माघार घेणार?
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती माघार घेण्याची  शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे माघार घेऊ शकतात. संभाजी राजे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लझवावी अशी भूमिका घेतली होती. पण संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे शिवसेनेने दुसऱ्या जागेवर संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली.