मुंबई : पाहुण्यांचं स्वागत करणं ही मातोश्रीची परंपरा आहे. कोणत्याही अजेंड्याशिवाय भेटी होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीये. या भेटीमागे काय उद्देश आहे, हे भाजपालाच माहित असा टोलाही त्यांनी लगावलाय. राऊत पुढे म्हणाले,   शिवसेना काय किंवा आम्ही सगळे सामान्य माणसे आहोत. सत्ता असो वा नसो आमचे पाय जमिनीवर असतात. सत्ता असली तरी आम्ही जमिनीवरच असतो आणि सत्ता नसली तरी आम्ही निराश होत नाही. आम्हाला हवेत चालण्याची सवय नाही. आम्ही साधी माणसं आहोत त्यामुळे कोणी प्रमुख आलं जसं अमित शहा मातोक्षीवर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही साधारण भेट आहे. या भेटीमागे कोणताही अजेंडा नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे ज्यांना युती व्हायला नको आहे, ते अशी भाषा करत असल्याचा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी लगावलाय... शिवसेना म्हणेल तेव्हाच युतीची चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले...