मुंबई : ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मित्रपक्ष शिवसेनेनं अभिनंदन केलंय. हा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखं असल्याची स्तुतीसुमनं शिवसेनेनं उधळलीत. 


आशीष शेलार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. शनिवारी निकालानंतर आज बहुत नाखुश होंगे असं म्हणत शिवसेनेला डिवचलं होतं.


तेच कायम नाखुश असतात- संजय राऊत


आशीष शेलारांच्या या टीकेलाच राऊतांनी शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलंय. ज्यांच्या डोक्यात कायम किडे वळवळतात तेच कायम नाखुश असतात, असा टोला राऊत यांनी लगावलाय.