मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील राज्यपालांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. 


12 आमदारांच्या नियुक्तीची आठवण!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!," अशा खास शैलीत राऊत यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


'प्रसाद दिला आहे शिवभोजन थाळी द्यायला लावू नका' 


दरम्यान, शिवसेना भवनासमोर भाजपने केलेल्या आंदोलनावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. शिवसेना भवनावर हल्ला कोणाची करण्याची हिम्मत नाही. काल आलेले लोक कशासाठी आले होते, त्यांचा संबंध काय आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे आम्हाला शिवभोजन थळी द्यायला लावू नाका असा सज्जड इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.


मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना शुभेच्छा


विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नियुक्तीवरुन सध्या ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये कटुती निर्माण झाली आहे. पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवनावर जात शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं अभिष्टचिंतन केलं.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून शुभेच्छा


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज राजभवनावर जात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.