Sanjay Raut : ठाकरे गटाचे  (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित हा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपांमुळे शिंदे-ठाकरे गटातील कलह आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हटलंय संजय राऊत यांनी पत्रात
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.



आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी दिलेल्या पत्राची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, असं आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडतायत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्या गद्दार आमदारांनी गोळीबार केला त्यांच्यावर कुठेच कारवाई झाली नाही, अनेक गद्दार आहेत ज्यांनी धक्काबुक्की किंवा इतर काही केलंय त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.