मुंबई : विरोधकांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत संविधान बवाच रॅली काढली. या रॅलीला देशभरातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान बचाव रॅली सुरूवात करण्यात आली. गेट वे ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपली आहे.



या संविधान बचाव रॅलीत शरद पवार, शरद यादव, डी.राजा, सीताराम येचुरी, राजू शेट्टी, ओमर अब्दुल्ला, सुप्रीया सुळे, पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, जोगेंद्र कवाडे, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला.