मुंबई : सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालणारं मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेव्ह रिव्हर व्हिडिओवर काँग्रेसनंही सडकून टीका केली. 


नियमांचा भंग केल्याचा काँग्रेसचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रफीतीमुळे अखिल भारतीय नागरी वर्तणूक सेवा आणि महाराष्ट्र नागरी वर्तणूक सेवा या नियमांचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 


कार्यक्रमाची तिकीटविक्री सुरु


या चित्रफीतीत सहभागी असलेले मुंबई महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी केलीय. सेव्ह रिव्हरचा दहीसरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची तिकीटविक्री सुरु आहे.


सरकारी अधिकारी कसे भाग घेऊ शकतात?-काँग्रेस


मुख्यमंत्री अनेक महत्वाचे सरकारी अधिकारी असलेल्या या चित्रफीतीचा वापर व्यवसायासाठी कसा होऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय, तसंच ही चित्रफीत भाजपकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवणाऱ्या विक्रम चौगुलेने तयार केलीय, मग भाजपची संबधित संस्थेशी चित्रफीतीमध्ये सरकारी अधिकारी कसे भाग घेऊ शकतात असा सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहेत.