दहिसर : Dahisar SBI bank robbery : भरदिवसा SBI बँकेच्या दहिसर येथील शाखेवर दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण परसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना दरोड्याप्रकरणी अटक केली आहे. आता SBI बँक दरोड्याचा हळूहळू उलगडा होत आहे. यूट्यूबमध्ये बघून दरोड्याचा कट आखल्याची माहिती पुढे येत आहे. (SBI Bank Robbery: Planning done of the robbery after watching Youtube) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एसबीआय बँकेवर दरोडा टाकणारे दोघे चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी यांनी दिली. यूट्यूबमध्ये बघून दरोड्याचा कट आखला, असे त्यांनी सांगितले. तसेच यामध्ये महत्वाची भूमिका श्वानाने बजावली आहे. त्याच्या मागाने हा दरोड्यातील आरोपींची माहिती मिळाली. 


असा लागला आरोपीचा शोध


दहिसर पश्चिम याठिकाणी दिवसाढवळ्या SBI बँकेवर दरोडा टाळण्यात आला होता. यामध्ये एक 25 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड घेऊन हे आरोपी फरार झाले होते. त्यानंतर पोलिसनी लगेच आरोपीचा शोध घेण्यासाठी 8 टीम तयार केल्या. यामध्ये पोलिसानी डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीला शोधले आहे. 



पोलीस दलातील श्वानाने प्रथम आरोपीच्या चप्पलचा माग काढला. दहिसर पूर्व पोस्ट ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या म्हाडा बिल्डिंगजवळ ती प्राप्त झाली. त्याने दहिसर मार्केटमध्ये आरोपी लपून बसला होता, ते ठिकाण दाखवले. त्यानंतर दहिसर पूर्व भरूचा रोड या ठिकाणाहून दोन्ही आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.