Crime news: महाराष्ट्रातील ठाण्यात परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये दुबई-मलेशियामध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी  अनेकांची 8.3 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडी, ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एफआयआर एका टेलरचं काम करण्याऱ्या व्यक्तीने नोंदवला आहे. यानंतर शनिवारी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या फसवणूकीच्या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


मलेशिया-दुबईत नोकरी देण्याचं आश्वासन


एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, आरोपींनी पीडितांना सप्टेंबर ते नोव्हेंबर 2022 दरम्यान मलेशिया आणि दुबईमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावेळी त्यांनी व्हिसा, पासपोर्ट आणि विमान तिकिटांची व्यवस्था करण्यासाठी पीडितांकडून पैसे गोळा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


विमानाची बोगस तिकीटं दिल्याचा आरोप


पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, बनावट विमान तिकीट दिल्याने पीडित मुंबई आणि कोलकाता विमानतळावर अडकले होते. यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान यासंदर्भात अधिक तपास सुरु असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय.