मुंबई : पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूलबस महागलीय. मुंबईत स्कूलबस भाड्यात 20% वाढ करण्यात आली आहे. आता टॅक्सीमेन्स युनियननेही टॅक्सीचं भाडं 25 रूपयांवरून 30 रूपये करण्याची मागणी केली आहे. मुंबईत पेट्रोल 120 रूपयांपार गेलंय. तर डिझेल जवळपास 105 रूपयांनी विकलं जातंय. याशिवाय बससाठी आवश्यक बॅटरी, टायर, इतर स्पेअर पार्टचे दरही वाढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने फिटनेस, विमा, पीयूसी यांचं शुल्कही वाढवलं आहे. मुंबईत टोलही वाढला आहे. त्यामुळे स्कूलबस मालकांसमोर दरवाढीशिवाय पर्यायच नव्हता असं सांगण्यात येतं आहे.


याआधी ऑनलाईन अॅप बेस उबरने (Uber Taxi) देखील भाडेवाढ केली आहे. इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर आणखी भाडेवाढ होण्याची संकेत कंपनीने दिले होते.


पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीच्या दरात ही वाढ होत आहे. त्यामुळे ही वाढ केली जात असल्याचं म्हटलं जात आहे.