मुंबई : भाजपा आमदार राम कदम यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत त्यांनी १८ वर्षावरील युवकांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्याचं आवाहन केलंय. महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरूपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा, असं आवाहन कदम यांनी ट्विटरवरच्या या व्हिडीओद्वारे केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय मतदार यादीत नाव नोंदवल्यास सिनेमाचं चित्रीकरण पाहाणं आणि कार चालवणं शिकवण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी या व्हिडीओद्वारे दिलीय. तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत असल्याचे कदम यांनी या व्हिडीओत सांगितलंय. 


दरम्यान, राम कदम यांच्या या व्हीडीओवर आमदार जितेंद्र आव्हांड यांनी आक्षेप घेतलाय. राम कदम हे मतदार होण्यासाठी तरुणांना आमिष दाखवत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.