मुंबई : विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत. २५ मार्चला होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून यातल्या पाच जागा आरक्षित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत युवा सेना आणि अभाविपमध्ये प्रमुख लढत रंगणार आहे. एकूण ६२५५९ मतदारांची नोंदणी झाली असून यापैकी अंदाजे ४० हजारांची नोंदणी आपण केल्याचा दावा युवा सेनेनं केलाय. 


गेल्या निवडणुकीत दहापैकी आठ जागा जिंकत युवा सेनेनं विद्यापीठावर भगवा फडकवला होता. आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे यंदा निवडणुकीची धुरा देण्यात आली आहे. तर युवा सेनेला रोखण्यासाठी अन्य संघटनांना एकत्र आणण्याची अभाविपची रणनीती आहे.