मुंबई : आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्ट प्रसासन योग्य प्रकारे काम करत नसल्याचा या चार न्यायाधीशांनी आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. न्‍यायाधीश जे चेलेश्‍वरम, रंजन गोगोई, मदन लोकुर और कुरियन जोसफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. यावर प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 



उज्वल निकम म्हणाले की, ‘हा भारतीय न्यायपालिकेसाठी काळा दिवस आहे. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेने चुकीचा संदेश जाऊ शकतो. यापुढे सर्वसामान्य नागरिक न्यायव्यवस्थेकडे संशयाने बघण्याची शक्यता आहे. प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात’.