मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत (Lata Mangeshkar Health update) मोठी माहिती समोर आली आहे. लता दीदी यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे दक्षिण मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९ जानेवारीपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (senior singer and bharatratna lata mangeshkar health not well)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता दीदी अजूनही आयसीयूमध्ये असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मात्र, त्यांचे वय पाहता बरे होण्यास वेळ लागत आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली.



दरम्यान, दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्या यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन मंगशेकर कुटुंबियांनी केल्याचे प्रवक्त्या अनुषा अय्यर यांनी सांगितले आहे.