मुंबई : पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलंच झोडपलं आहे. मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटांसह आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) उद्याही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. आज सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत मध्य मुंबईत ५६.६२ मिमी, पूर्व उपनगरात २१.४१ मिमी आणि पश्चिम उपनगरात ४०.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 



मुंबईच्या पश्चिम भागात कुलाब्यापासून भाईंदरपर्यंत ढग दाटून आले आहेत. या ढगांची जास्तीत जास्त उंची ७ ते ८ किमी आहे, त्यामुळे मुंबईत मागच्या ३ ते ४ तासात मुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी ७० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या ३ ते ४ तासांमध्ये अशाच पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.