Shah Rukh Khan Anant Ambani Video: काही दिवसांपूर्वी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या जुळ्या नातवांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. निता अंबानींची कन्या ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामल यांची जुळी मुलं कृष्णा आणि आदिया यांच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सामान्यपणे अंबानींच्या सोहळ्याला ज्या पद्धतीने सेलिब्रिटींची मांदियाळी दिसते तसेच दृष्य या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला दिसून आलं. पाहुण्यांमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही उपस्थित होते.


मस्करीमध्ये हातात ठेवला साप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा आणि आदिया यांच्या वाढदिवसाला आलेल्या प्रत्येक सेलिब्रिटीची झलक प्रसारमाध्यमांच्या कॅमेराने टीपली. मात्र याचदरम्यान घडलेला एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनंत अंबानी हे त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चेंटबरोबर मस्करी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शाहरुख खानच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. अनंत अंबानी बोलत असतानाच मस्करी मस्करीत शाहरुख खानच्या हातात एक साप देताना दिसतात.


अनंत अंबानींनी शाहरुखच्या हाती दिला साप


अनंत अंबानींनी अचानक हातात साप ठेवल्यानंतर आधी शाहरुख थोडा गोंधळतो आणि नंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य दिसून येतं. त्यानंतर शाहरुखच्या गळ्यात अजून एक साप लटकवला जातो. शाहरुखचा हा अवतार पाहून राधिकाही हसू लागते. अनंत अंबानी शाहरुखला साप हातात पकडण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं दिसतं आहे.


राधिका साप घ्यायला गेली अन्...


शाहरुख खान काळा सूट आणि शेड्समध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्याबरोबर उभा असल्याचं दिसतं. अचानक अनंत अंबानींनी हातात साप ठेवल्यानंतरही शाहरुख घाबरत नाही. दुसरीकडे राधिका मात्र अनंत अबानींनी शाहरुखच्या हातात साप दिल्याचं पाहून उत्साहामध्ये किंकाळू लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राधिका शाहरुखच्या हातून साप घेण्यासाठी पुढे सरसावताना दिसतेय. मात्र अचानक शाहरुख काहीतरी म्हणतो आणि राधिका हसत हसतच शाहरुख पासून दूर जाते. अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या असून शाहरुख डचकला नाही याचं त्याच्या चाहत्यांना कौतुक वाटलं आहे.



अनेक कलाकारांची हजेरी


मुकेश अंबानींची नातवंडं असलेल्या कृष्णा आणि आदिया यांच्या वाढदिवसाला अभिनेत्री कटरिना कैफ, कियारा आडवणाी, करिश्मा कपूर, अनन्या पांडे यांच्याबरोबर अभिनेता आदित्य रॉय कपूरही उपस्थित होते. दिग्दर्शक करण जोहर त्याची जुळी मुलं यश आणि रुहीला घेऊन पार्टीला आला होता.