मुंबई : शेतक-यांचा किसान मार्च मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोर्चात सहभागी झालेल्या शेतक-यांत प्रेरणेचा स्त्रोत कायम ठेवण्याचं काम लोकशाहीर करतात. 6 मार्चला नाशिकच्या सी.बी.एस. चौकात एक वादळ घोंघावू लागलं आहे आणि हे वादळ मुंबईच्या दिशेनं वाटचाल करु लागलं.. जसजसं हे वादळ मुंबईच्या दिशेनं येत होतं.. त्याचा वेग वाढत होता. आता हे वादळ मुंबईच्या दारात पोहोचलय आहे.


मोर्चाचा मुंबईत प्रवेश 


लाँग मार्च शेतक-यांच्या, शेतमजूरांच्या वेदनेचा एल्गार.. समाजातल्या तळागाळातील कष्टकरी समाजाचा लाँग मार्च..  जस जसा हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं येऊ लागला.. त्याची भव्यता पाहून अनेक पक्षांनी, संघटनांनी त्याला पाठींबा दिला.. तळपत्या उन्हात पायी चालणं.. रस्त्यावरच जेवणं, तिथंच झोपणं असा या मोर्चेक-यांचा दिनक्रम.. मात्र या मोर्चेक-यांमध्ये प्रेरणेचा स्त्रोत कायम ठेवण्याचं काम एक शाहीर करत आहे. 


रखरखत्या उन्हात मैलोन मैल पायी चालत जेव्हा हा लाँग मार्च रात्रीच्या विसाव्यासाठी तळ ठोकतो त्यावेळी दिवसभर चालून थकलेल्या शेतकऱ्यांच्या कानावर जगन म्हसेंच्या क्रांती गीताचे स्वर कानी पडतात. त्यांनी शेतक-यांना प्रेरणा देणारे अनेक  क्रांतिगीतं रचली . त्यांची ही क्रांतिगीत सध्या सुरू असलेल्या लाँग मार्चमध्ये शेतकऱ्यांला कधी प्रेरणा तर कधी त्यांचं धगधगतं वास्तव समोर आणते. 


कोण आहेत हे शाहीर 


प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी  जगन म्हसे  आणि त्यांचे सहकारी ही क्रांतीगीत सादर करतात आणि लांबचा पल्ला गाठून  थकलेल्या शेतकऱ्यांच्या अंगात पुढचा टप्पा गाठण्याचा बळ येतं. त्यांची ही क्रांती गीत शेती,  रोजगार , बेरोजगार,  शिक्षण अशा अनेक विषयांवर भाष्य करणारी असतात . त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ती आपलीशी वाटतात. .

12 तारखेला हा मोर्चा विधानसभेवर धडकेल आणि विधानसभेला बेमुदत महाघेराव घालण्यात येईल.. आतापर्यंत राज्यात अनेक मोर्चे निघाले.. मात्र शेतक-यांच्या मोर्चानं सा-यांचंच लक्ष्य वेधलं.. कारण या मोर्चात कष्टकरी वर्गा सामिल झालाय.. त्याला ना जातीचा रंग ना धर्माचा.. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार कारेलही...जगन यांच्यासारखे लोकशाहीर प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या क्रांती गीतातुन या शेतकऱ्यांना व्यवस्थेविरोधात लढण्याचा बळ देत राहतील..