मुंबई :  Shakti Mill Gangrape Case : 2013मधील मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार (Shakti Mill Gangrape) प्रकरणातील शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालय अंतिम निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने यापूर्वीच तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली दिली. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने तिन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकाल देताना न्यायमूर्ती साधना जाधव यांनी म्हटले, केवळ शारिरीक नाही तर मानसिक वेदना आणि धक्का महिलेला बसला आहे. हे क्रूर कृत्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने जनभावना लक्षात घेऊन निकाल दिले आहेत. 376(ई) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. अशा घटनेत महिलेच्या कुटुंबाला सामाजातील काही घटकांना सामोरे जावे लागते.


शक्ती मिल गॅंग रेप : तिघांना जन्मठेपेची शिक्षा



शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन दोषींनी फाशीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज दोषींना VC द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना सेशन कोर्टने फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपींनी 2014 मध्ये  मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 2019 मध्ये उच्च न्यायालयाने अरोपीचं अपील फेटाळले होते. आज उच्च न्यायालय आणि सेशन कोर्टच्या शिक्षेची पुष्टी करून निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.