मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना धमकीचा फोन (Threat Call) आल्याची बातमी काही वेळेपूर्वी पुढे आली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कुर्डुवाडी दौऱ्यावर आहेत. दौऱ्यासाठी येऊ नये असा धमकीचा फोन आल्याचं म्हटलं जात होतं. पण या बातमीचं शरद पवार यांनी खंडन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस कंट्रोल रूमकडे धमकीचा फोन आल्याची बातमी होती. शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकीचा फोन आल्याची बातमी व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण मुंबई पोलीस आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील असा कोणताही फोन आला नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे सकाळीच दौऱ्यासाठी निघाले होते. त्यानंतर धमकीचा फोन आल्याचं म्हटलं जात होतं. पण आता हे वृत्त त्याने फेटाळले आहे.


विधानसभेचे माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. शरद पवार यांनी आपला नियोजित दौरा पूर्ण केला.