मुंबई : Sharad Pawar - CM Uddhav Thackeray News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीतील चर्चेकडे लक्ष लागले आहे. शरद पवार हे राजकीय सद्यस्थितीसह आरक्षण, अतिवृष्टी मदतीवर चर्चा करण्याची अपेक्षा आहे. मात्र, ही अचानक भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांनी काल राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली. त्यात शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे करत नसल्याची तक्रार अनेकांनी केल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याचे भेटीची उत्सुकता वाढली आहे.



दरम्यान, सोबतच केंद्रीय तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी सुरु आहे. त्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. मात्र राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आरक्षण नियमित होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसची देखील हिच भूमिका आहे. मात्र काल झालेल्या बैठकीमध्ये निवडणुका जाहीर झाल्यास ओबीसी उमेदवारांच्या जागेवर केवळ ओबीसी उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाकडून स्पष्ट केले होतं. तसेच या मुद्द्यावर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी देखील आजच्या भेटीदरम्यान चर्चा करणार असल्याची माहिती आहे.