शरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...
राज्य सरकारनं शेतक-यांसाठी सुरु केलेल्या कर्जमुक्तीच्या योजनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय.
मुंबई : राज्य सरकारनं शेतक-यांसाठी सुरु केलेल्या कर्जमुक्तीच्या योजनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय.
त्याचवेळी या योजनेचा लाभ देताना थोडी वास्तविकता सु्द्धा पाहा अशी सूचना, शरद पवार यांनी सोलापुरातल्या शेतकरी मेळाव्यात केली.
दिर्घ मुदतीच्या कर्जमुक्ती प्रकरणात शेतक-यांच्या वाट्याच्या दीड लाखाची कर्जाची रक्कम शेतक-यांनी भरावी. उरलेल्या कर्जाला दहा वर्षांचे हप्ते पाडून द्यावेत. मग शेतकरी व्याजासहित कर्जाची परतफेड करेल अशी खात्री यावेळी शरद पवारांनी सरकारला दिली.
दरम्यान शेतक-यांना न मागता थकबाकीदार पदवी दिली गेली आहे. त्यामुळे त्यांना कुठेही कर्ज मिळत नाही. त्यामुळे त्यांचा प्रगतीचा मार्ग रोखला जात असल्याकडेही शरद पवारांनी यावेळी लक्ष वेधलं.