Sanjay Raut on Sharad Pawar Retirment : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार असा प्रश्नही विचारला जात आहे. यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar steps down as NCP president)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले संजय राऊत
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. शरद पवारांसारखे नेते राजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत, हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  पण देशाला आणि महाराष्ट्राला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. एखाद्या पदावरुन दूर होणं म्हणजे राजकारणातून, समाजकारणातून दूर होणं असं नाही. त्यांच्या पक्षात बैठका सुरु आहेत, काही निर्णय घेतले जातील. या घटना अनपेक्षित नाही. शरद पवार यांनी हा निर्णय का घेतला. याचं विश्लेषण तेच करु शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


बाळासाहेबांनीही राजीनामा दिला होता
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धी पदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील, राजकारणातील आणि महाराष्ट्रातील घडामोडींची त्यांना उबक आली होती. पण लोकमताचा आणि शिवसैनिकांचा रेटा इतका अफाट होता, काही दिवसांनी पुन्हा जनतेने त्यांना त्या पदावर विराजमान केलं, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करु असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.


महाविकास आघाडीवर परिणाम
या सर्व घडामोडींचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल असं वाटत असेल तर तसं काही होणार नाही. राष्ट्रलादी काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नाचा आघाडीवर परिणाम होणार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद नेतृत्व हे शरद पवारच करतात. शिवसेना पक्ष गेली ठाकरे या एका नावावर चालला आहे, त्याचपद्धतीने जिथे शरद पवार तिथे त्यांचा पक्ष हे ठरलेलं आहे.


भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला..
शरद पवार यांच्या मनात काय सुरु आहे याची कुणकुण कदाचित सुप्रिया सुळे आणि प्रतिभाताईंनी नसावी, पण शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय हा अनपेक्षित नव्हता तसंच ही खेळी नसावी हा एक भावनिक निर्णय असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.