मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी ठाण्यात घेतेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सर्वप्रथम कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना दिसत नाहीत", असं दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या आरोपांना आत शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत असा उल्लेख केला. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो, इथे केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान यांवर माझं कमीतकमी 25 मिनिटाचं भाषण आहे. 


सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचण्याची मला सवय आहे. त्यासाठी लवकर उठावं लागतं, अला टोला शरद पवार यांनी लगावला आहे. 


राज ठाकरे यांनी दुसरा उल्लेख केला, फुले, शाहू, आंबेडकरांचा उल्लेख मी करतो, त्याचा अभिमान आहे मला, दुसरी गोष्ट माहित असली पाहिजे या महाराष्ट्रात शिवचत्रपतींच्या संबंधी सविस्तर वृत्त काव्याच्या माध्यमातून कुणी लिहलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं आहे. 


त्यामुळे फुले काय, शाहु महाराज काय आणि आंबेडकर काय हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आस्था असलेले  घटक आहेत. 


बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना जिजाऊंनी शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांचं योगदान होतं असं विधान केलेलं आहे. त्याला माझा सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊंनी कष्टाने उभं केलं. बाबासाहेबांनी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला ते योग्य नव्हतं असं माझं त्यावेळी मत होतं आणि आजही आहे.


जेम्स लेन यांनी जे काही लिखान केलं, त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखात होता, त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे ही माहिती मी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून घेतली. गलिच्छ लिखाण लेखकाने लिहिलं,पण त्यावर खुलासे पुरंदरे यांनी केले नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं,


आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत महागाईचे, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, यावर आपल्या भाषणात बोलत नाहीत अशी टीकाही शरद पवार यांनी केली.