मुंबई : राज्यात अजून सरकार स्थापन होत नसल्याने, कुठेतरी हा तिढा सुटावा म्हणून आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल, यावर शरद पवार यांचा सल्ला घेण्यासाठी ही भेट असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. भाजपकडून आलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या सिल्ह्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार आणि रामदास आठवले यांची चर्चा झाल्यानंतर या नेत्यांनी मीडियासमोर येत आपलं मत माडलं. तेव्हा रामदास आठवले यांनी सांगितलं की, शरद पवार यांनी असा सल्ला दिला आहे की, 'शिवसेना आणि भाजप महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे, त्यांनी आपसातील तिढा सोडवून लवकरात लवकर सरकार स्थापन करावं', तसेच राज्यपालांनी मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण द्यावं, असं देखील पवारांनी म्हटलं आहे.


तसेच यावर आणखी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, 'लोकांनी आम्हाला एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून कौल दिला आहे, आणि ती भूमिका आम्ही पार पाडू, असं शरद पवारांनी सांगितल्याचं रामदास आठवले यांनी सिल्व्हर ओक येथे पत्रकारांना सांगितलं.