आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल... शरद पवारांकडून विश्वास व्यक्त
काय म्हणाले शरद पवार?
मुंबई : महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चाललंय. सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय. सरकार चालवताना निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तीनही पक्षांच्या नेत्यांची समन्वय यंत्रणा आहे याची पवारांनी तीनही पक्षांना आठवण करून दिलीय़. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्याचा अधिकार आहे असं ते स्वबळाच्या मुद्द्याबाबत म्हणाले. मात्र मतभेद नाहीत यावर त्यांनी जोर दिला.
पवार पुढे म्हणाले, 'कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही'
'राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचं सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत. 'असं देखील शरद पवार म्हणाले.