मुंबई : शनिवारची सकाळ उजाडली ती महाराष्ट्रातील 'महाभूकंप' घेऊनच... सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एका रात्रीत अशी काय गोष्ट घडली की, भाजपा आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. या सगळ्याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे शरद पवार गेले कित्येक दिवस महाआघाडीमार्फत शिवसेनेशी चर्चेत होते. नेमकं असं काय झालं की, महाआघाडीची चर्चा सोडून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथविधीच्या कार्यक्रमात अजित पवारांसोबत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार ही एकच व्यक्ती उपस्थित होता. त्यामुळे राष्ट्रवादीत गट फुटला की काय? अशी देखील आता चर्चा आहे. अजित पवारांनी भाजपाला सपोर्ट करत एका रात्रीत महाराष्ट्रातील 'राष्टपती राजवट' हटवून स्थिर सरकार स्थापन केलं आहे. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत, 'स्थिर सरकारकरता मी हा निर्णय घेतला. बरेच दिवस शिवसेनेसंदर्भात शरद पवारांची चर्चा सुरू असूनही ठाम निर्णय होत नव्हता. या चर्चांना कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे.' (देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ



उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा गट फुटला? असं या परिस्थितीतून वाटत आहे. या सगळ्या प्रकरणावर आता शरद पवारांची भूमिका पाहणं महत्वाची राहणार आहे. शरद पवारांना या संदर्भात माहित होतं का? असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता ते म्हणाले, 'या अगोदर मी शरद पवारांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी त्यांना म्हटलं महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. महाआघाडीत शिवसेनेच्या मागण्या वाढतच आहेत. पण यापुढे झालेली चर्चा शरद पवारांना माहित नाही.' यावरून अजित पवारांनी राष्ट्रवादीचा गट फोडला का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ)