मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना पण थरारक किस्सा सांगितला आहे, तेव्हा शरद पवार यांनी पायलटला सांगून कसं प्रसंगावधान राखलं आणि या संकटातून सहीसलामत बाहेर पडले हा किस्सा शरद पवार यांनी आज सांगितला. तर  शरद पवार यांनी त्यांचा व्यक्तीगत अनुभव सांगितला.


शरद पवार यांनी सांगितलेला हेलिकॉप्टरचा किस्सा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार म्हणात 'एकेदिवशी मी राज्याचा मुख्यमंत्री असताना, मी पुण्याहून मुंबईला लोणावळा- खंडाळावरुन चाललो होतो. या परिसरात एक खोल दरी आहे, आणि उंचच उंच डोंगर, या दरम्यान सोसाट्याचा, जोराचा वारा आणि मोठ्या प्रमाणात ढग जमले होते. दूरपर्यंत जंगल आणि डोंगर दिसत होते, त्यात ढगांची गर्दी, हवेचा दबाव.'



'यात पायलट गडबडला. हेलिकॉप्टर काही पुढे जाईना. पुढचं काही दिसेना. तातडीनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आजूबाजूला डोंगर आहेत, पहाड आहेत, येथे आजूबाजूला हेलिकॉप्टर आदळलं, तर हा शेवट आहे.'


'पण मला आपल्याला महाराष्ट्राची ज्याची आपल्याला सर्वांना माहिती आहे. लहानपणी आपल्याला शिकवलं जातं की, कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे.' 


'कळसूबाईची शिखर ज्याची उंची ५ हजार फुटांपेक्षा जास्त आहे. तेव्हा मी पायलटला सांगितलं, हेलिकॉप्टर ७ हजार फुटांवर तू घे. यानंतर ७ हजार फुटांवर गेल्यानंतर हे हेलिकॉप्टर कुठे आदळायची शक्यता नव्हती. यानंतर आम्ही या संकटातून सुखरुप बाहेर पडलो.'