मुंबई : ज्या शिवसेनेने भाजपच्या जागा वाढविण्यास मदत केली त्यांनाचा हे बाजुला सारायला निघाले. जर शिवसेना यांच्यासोबत नसती तर यांच्या एवढ्या जागा तरी आल्या असता का, याचा विचार भाजपने केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेना यांच्यासोबत राहिली. त्यांना साध दिली. त्यामुळे यांची मजल १०५ च्या घरात गेली. अन्यथा केवळ ४० ते ५० वरच समाधान मानावे लागले असते, अशी जोरदार फटकेबाजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी केली. संपादक संजय राऊत यांनी पवारांची मुलाखत घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ज्या १०५ जागांवर विजय मिळवला आहे, त्यामध्ये शिवसेनेचे मोठे योगदान आहे. भाजपने मित्र पक्षाला गृहित धरण्याची भूमिका अयोग्य असल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. या निवडणुकीत तुम्ही शिवसेना मायनस केले असते त्याच्यासोबत गेला नसता तर १०५ चा आकडा तरी दिसला असता का, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


या मुलाखतीत शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या राजकीय नातेसंबंधावर भाष्य करत जोरदार टीका केली. त्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या  ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व आरोपांचे खंडन करत त्यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी उत्तरे दिली. ही मुलाखत ११, १२ आणि ११ जुलैला प्रसारित करण्यात येणार आहे.


भाजपने शिवसेनेला गृहीत धरले...


भाजपने ज्यांच्या सोबत १०५ चे जे संख्याबळ मिळवले त्या शिवसेनेला यांनी गृहीत धरले. हीच चूक त्यांना महागात पडली आहे. आज तुमच्यासोबत शिवसेना नाही. त्यांची मदत घेतल्याने तुम्हाला यश मिळाले. मात्र, काय उपयोग झाला?  १०५ आमदार असतानासुद्धा प्रमुख पक्ष सत्ता स्थापन शकला नाही. सत्तेवर येऊ शकला नाही. हीसुद्धा एक अजब कला किंवा महाराष्ट्रात चमत्कार होता. याला तुम्ही काय म्हणाल, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला होता. त्यावर पवार यांनी जोरदार उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, तुम्ही ज्याला प्रमुख पक्ष म्हणताय तो प्रमुख कसा बनला याच्याही खोलात जायला पाहिजे. माझे स्पष्ट मत आहे की, विधानसभेला त्यांच्या आमदारांची १०५ ही जी फिगर झाली त्यात शिवसेनेचे योगदान फार मोठे आहे. त्यातून तुम्ही शिवसेना मायनस केले तर काय हाती राहते. तुम्हाला कुठेतरी ४०-५० च्या आसपास राहावे लागले असते. भाजपचे लोक जे सांगतात की, आम्ही १०५ असतानाही आम्हाला आमच्या सहकाऱ्याने म्हणजे शिवसेनेने दुर्लक्षित केले किंवा सत्तेपासून दूर ठेवले. त्यांना इथंपर्यंत पोहोचवण्याचे काम कोणी केले? शिवसेनेनेच केले ना!, मग शिवसेनेला जर गृहीत धरण्याची भूमिका घेतली.