मुंबई : सध्या शिवसेनेत असलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पाटील यांनी पवारांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उदयनराजेंच्या विरोधात पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. आता साताऱ्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार असून, नरेंद्र पाटील ती लढवण्याच्या विचारात असल्याचे समजते आहे. अशावेळी त्यांनी पवारांची भेट घेतल्याने नरेंद्र पाटील यांच्या पुढील भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 


दरम्यान, माथाडी कायद्याला ५० वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपण पवारांची भेट घेतली, असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी 'झी २४ तास'शी दूरध्वनीवरून बोलताना दिले आहे.