शेअर बाजार कमालीचा कोसळला, युद्धामुळे आशियाई बाजारात मोठी पडझड
रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात कमालाची पडझड सुरू आहे. सेन्स्केक्स 1600 अंशांनी तर निफ्टी जवळपास 400 अंकांनी कोसळला
मुंबई : आज शेअर बाजार कमालीचा कोसळला आहे. युद्धामुळे आशियाई बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 1600 अंकांनी तर निफ्टी 400 अंकांनी गडगडला आहे. रुपयाही नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
शेअर मार्केटमध्ये आज मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धामुळे आशियाई बाजारात मोठी पडझड झाली आहे. विक्रीचा सपाटा आजही सुरूच राहणार आहे.
रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात कमालाची पडझड सुरू आहे. सेन्स्केक्स 1600 अंशांनी तर निफ्टी जवळपास 400 अंकांनी कोसळला. रशिया युक्रेन युद्धामुळे ग्लोबल मार्केटमध्ये पडझड झालीय.
आशियाई बाजार 2.5% ते 3% कोसळले आहेत. भारतीय बाजारतही विक्रीचा जोर कायम आहे. दुसरी बातमी पाहूयात शेअर बाजारासंदर्भात... आठवड्याची सुरूवात शेअर बाजारात मोठ्या पडझडीने होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात आज पुन्हा मोठ्या घसरणीचे संकेत आहेत. राहण्याची शक्यता आहे.
एफपीआयने मार्चमध्ये १७,५३७ कोटी काढले
या विक्रीचा परिणाम परदेशी गुंतवणूकदारांवरही दिसून येत आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) 2 ते 4 मार्च या मार्च महिन्याच्या केवळ तीन दिवसांत भारतीय शेअर बाजारातून 17,537 कोटी रुपये काढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदार घाबरले आहेत. या वाढत्या किमतीने FPIs च्या बाहेर जाण्याचा वेग वाढवण्याचे काम केले आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरलेली स्थिती पाहता FPI सुद्धा आपली गुंतवणूक कमी करत आहेत.