फक्त सण साजरे करणे म्हणजे देशाची संस्कृती जपणे असं नाही. तर नागरिकांना योग्य सुरक्षा आणि चांगले रस्ते देणं ही देखील संस्कृती जपणेच आहे, अशा शब्दात अभिनेता शशांक केतकरने पुन्हा एकदा सामाजिक प्रश्नाला वाट करुन दिली आहे. अभिनेता शशांक केतकर कायमच आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असतो. यावेळी त्याने मिरा-भाईंदर रस्त्यांची दुरावस्था व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था देखील त्याने या पोस्टमधून दाखवली आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सगळ्यांच लक्ष या प्रश्नाकडे वेधलं आहे. 


महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कधी होणार? 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा-भाईंदर येथे छत्रपती शिवाजा महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून एक लाल कपडा घालून ठेवण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण कधी होणार? असा सवाल शशांक केतकरने यावेळी विचारला आहे. एवढंच नव्हे तर या पुतळ्याच्या स्वच्छतेचा प्रश्न देखील शशांक केतकरने येथे विचारला आहे. 


महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी 


शशांक केतकरने महाराजांचा फोटो पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. लाज वाटली पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेले तीन महिने लाल कपड्यात झाकून ठेवलेला आहे. या पुतळ्याचं अजून लोकार्पण झालेलं नाही. यासाठी राजकीय मंडळींच्या नावाच्या चिठ्ठ्या निघणार की काय असा सवाल विचारला आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या पायाजवळ किंवा त्या परिसरात अपघात झाला तर ते महाराजांना तरी आवडेल का? असा सवाल देखील विचारण्यात आला आहे. 


शशांक केतकरची पोस्ट



जन्माष्टमीचं निमित्त का? 


शशांक केतकरने आपण हा व्हिडीओ जन्माष्टमीच्या दिवशी का पोस्ट केला आहे याचे कारण सांगितलं आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने हा व्हिडीओ मला पोस्ट करावा असं मुद्दाम वाटलं. कारण या सणानिमित्त राजकारणी मंडळी किती लाखाची दहिहंडी किंवा कोण सेलिब्रिटी आपल्याकडे येणार याचा गाजावाजा करतात. पण या रस्त्त्यांवरुन येणाऱ्या सेलिब्रिटीला आणि गोविंदाना खड्ड्यांचा त्रास होणार नाही का? असे सवाल ही शशांक केतकरने यावेळी विचारले आहेत.