मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूते १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सुशांतने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या कुटुंबाचे समर्थन करण्यासाठी अनेक कलाकारमंडळी अणि नेतेमंडळी त्याच्या घरी जात असतात. नुकताच अभिनेते शोखर सुमन आणि सुशांतचा खास मित्र संदीप सिंह यांची त्याच्या वडिलांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेखर सुमनने त्यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'मी सुशांतच्या वडिलांना भेटलो. पहिले काही मिनिटं तर आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. त्याचे वडील अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे शांत बसणे हे दुःख व्यक्त करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.' असं लिहिलं आहे. 



शिवाय शेखर सुमन यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत #justiceforSushantforum #CBIEnquiryForSushant हे हॅशटॅग सुरू केलं आहे. 



त्याचप्रमाणे त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले, 'जे दिसत आहे त्यापेक्षा मोठी घटना आहे. यासाठी आम्ही जस्टिस फॉर सुशांत मोहीम सुरू केली आहे. '  या मोहीमेसोबत लाखो जोडले गेले आसल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं. 


दरम्यान सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत होता. असं असतानाच घराणेशाहीमुळं त्याच्या कारकिर्दीत एक अनपेक्षित टप्पा आल्याचंही बोललं गेलं. या साऱ्यामध्येच मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण शोधण्यासाठीचा तपासही सुरु केला. ज्या धर्तीवर आतापर्यंत जवळपास २७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.