Shilpa Shetty - राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
Shilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय.
Shilpa Shetty Gold Scheme Case : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबईच्या एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर फसवणुकीचा आरोप केलाय. या गोल्ड स्कीम प्रकरणी चौकशीचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेय. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अडचणीच सापडले आहेत.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका सराफा व्यापाऱ्याने लावलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयने दिले आहेत. सराफा व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीत काही तरी तथ्य असेल म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. न्यायालयाने असंही सांगितलंय की जर आरोप सिद्ध झाल्यास पोलिसांनी या प्रकरणात भादविच्या आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी पोलिसांनी निर्देश दिले आहेत.
कोठारी न्यायालयात काय म्हणाले?
कोठारी यांच्या वकिलांने न्यायालयात सांगण्यात आलं की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे सत्ययुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. त्यांनी 2014 मध्ये एक योजना सुरू केली होती. ज्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना सोन्यासाठी अर्ज करताना सवलतीच्या दराने पूर्ण पैसे द्यावे लागतील आणि त्यांना मुदतपूर्तीच्या तारखेला सोन्याचे निश्चित प्रमाण देण्यात येईल. कोठारी यांनी या योजनेत 90 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याला 2019 मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर 5000 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे आश्वासन देण्यात आले होत. मात्र अद्याप ते सोने कोठारी यांना मिळालेले नाही. त्यानंतर 2020 मध्ये शिल्पा शेट्टी-राज कुंद्राने 90 लाख रुपयांचा पोस्टडेटेड चेक दिला. जी योजनेची मूळ रक्कम होती. त्यामुळे कोठारी यांनी शिल्पा आणि राज यांनी आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.