सरकार आलं... मंत्रिमंडळ विस्तार कधी? कशामुळं रखडला मंत्रिमंडळ विस्तार?
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारासाठी `तारीख पे तारीख`, आता नवा मुहूर्त
Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन तब्बल तीन आठवडे उलटून गेलेत. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेच महाराष्ट्राचा गाडा हाकतायत. पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याजिल्ह्यातला कारभार ठप्प आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज बैठका घेतायत, दौरे करतायत. पण मंत्र्यांअभावी अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची टीका विरोधकांकडून होतेय.
का रखडला मंत्रिमंडळ विस्तार?
23 जुलैला भाजप प्रदेश कार्यकारिणीची पनवेलमध्ये बैठक आहे
24 जुलैला अमित शाहांबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक होणाराय
25 जुलैला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत
हे सगळे नियोजित कार्यक्रम पाहता 26 ते 28 जुलै दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत दिल्लीच्या दोन वाऱ्या केल्या. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केवळ चर्चा झाल्याचं समजतंय.
येत्या 1 ऑगस्टला महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणाराय. विस्ताराला कोर्टाची आडकाठी नाही, असं शिंदे-फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मग तरीही मंत्रिमंडळ विस्तारात अडचण काय, याचं कोडं उलगडत नाहीय.