Shinde Group vs Thackeray Group : शिंदे गट आणि भाजप विरूद्ध ठाकरे गटात आणखी एक नवा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. त्याला कारण आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईत होत असलेलं स्मारक (Balasaheb Thackeray Memorial). शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरातील महापौर बंगल्याच्या (Mayor Bunglow) जागेवर हे स्मारक होत आहे. ही जागा बाळासाहेब ठाकरे ट्रस्टच्या (Balasaheb Thackeray Trust) नावावर झाली असली तरी बाळासाहेबांच्या स्मारकाची पूर्ण देखभाल राज्य सरकारनं करावी अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मुख्यमंत्र्यांकडे (CM Eknath Shinde) केलीय. इतकंच नाही तर ठाकरे कुटुंबातील एक किंवा दोन सदस्य सरकारनं स्मारक समितीवर घ्यावेत अशी मागणीही लाड यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ही' भाजपची मागणी नाही
तर बाळासाहेब ठाकरे स्मारकावर सरकारनं ताबा घ्यावा अशी भाजपची (BJP) मागणी नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केलंय. कुणाला काही वाटत असेल ती वैयक्तिक मागणी असू शकते असही त्यांनी नमूद केलंय. समितीत कोण सदस्य आहेत याच्यात आपल्याला रस नाही. मात्र स्मारकात खासगी बैठका होऊ नयेत आणि राष्ट्रीय स्मारकाचे नियम पाळले जातील असा टोलाही त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय. 


'प्रसाद लाड डुप्लिकेट'
साहजिकच प्रसाद लाड यांची मागणी ठाकरेसेनेला मान्य नाही. प्रसाद लाड हे डुप्लिकेट आहेत, ते मूळ भाजपचे नाहीत. त्यांच्या मागणीला अर्थ नाही अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.


मुख्यमंत्री शिंदे यांचं आश्वासन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मारकाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. शिवाजी पार्क परिसरात महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक बनतंय. स्मारकाचं 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालंय, त्याच कामाची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिलमधल्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रपणे बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवर करणार असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय.


शिंदे-ठाकरे गटात नवा वाद
बाळासाहेबांच्या स्मारकाचं आतापर्यंत 58% काम पूर्ण झालंय, 2023 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. म्हणजे स्मारकाचं काम पूर्ण व्हायला अजून एक वर्ष आहे. पण त्यापूर्वीच स्मारकाच्या मुद्यावरून ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारनं सुरू केली आहे की काय अशी चर्चा आता रंगलीय.