मुंबई : दसरा मेळावा (Dasara melava) जसाजसा जवळ येतोय तशी एकमेकांवर टीका देखील वाढत आहे. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट (Shinde vs Thackeray) आमने-सामने आले आहेत. दसरा मेळाव्यावर दोन्ही गट दावा करत आहेत. दोन्ही गट आपआपला दसरा मेळावा साजरा करणार आहेत. ठाकरे गटाची शिवतिर्थावर तर शिंदे गटाची बीकेसी येथे दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन यावेळी केलं जाणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गटाकडून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ रिलीज केले जात आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे गटाचा आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही अशी लाईन देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील एक क्लिप दाखवण्यात आली आहे.



काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्याने यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाश शिंदे हे 40 आमदारा महाविकासआघाडीतून बाहेर पडले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. ठाकरे गटाकडून आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. हा संघर्ष आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलाय. यावर सुनावणी सुरु आहे.


शिवसेनेचे 2 मेळावे


दसरा मेळावा हा शिवसेनेचा सर्वात मोठा कार्यक्रम समजला जातो. एक मैदान, एक पक्ष, एक नेता अशी शिवसेनेची दसरा मेळाव्यासाठी टॅगलाईन असायची. बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतिर्थावर यायचे. पण इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 वेगवेगळे दरावा मेळावे होत आहेत.


दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी


शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. आमदार खासदारांना कामे वाटून देण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात बसेस बूक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोण जास्त गर्दी जमवतं याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.