Maharashtra politics, मुंबई : बुलडाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडली. भावना गवळी आणि अब्दुल सत्तारांसह उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर  जहरी टीका केली. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते जनतेचं भविष्य काय घडवणार असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शेतक-यांचं वीजबिल माफ करून दाखवाच  असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर (Kiran Pavaskar)  उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) टीकेवर पलटवार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्थायी समितीचे माजी अध्यक्ष किरण पावस्कर यांनी उद्धव ठाकरेंची पोलखोल करणार असा इशारा  दिला आहे. मातोश्रीला किती खोके जायचे हे समोर आणणार. 8 ते 10 दिवसात उद्धव ठाकरेंना किती खोके जायचे याचे पुरावे देणार असल्याचे देखील किरण पावस्कर म्हणाले.  


बुलडाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंचे आक्रमक भाषण


उद्धव ठाकरेंची बुलडाण्यात सभा झाली. या सभेतून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज्यपाल, कर्नाटकडून येणा-या धमक्या या मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी शेतक-यांची वीजबिल माफी करूनच दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलंय. शिंदेवरही जोरदार टीका केली.  बुलडाणा जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदारासह अनेक पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंनाच आव्हान दिले.