दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : जवानांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.


विधानसभेत गोंधळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभेत प्रशांत परिचारिक यांचं पुन्हा निलंबन करण्यासाठी शिवसेनेचा गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलंय. 


चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण


आमदार प्रशांत परिचारिकांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीने एकमताने घेतला होता. या समितीमध्ये शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हेही होत्या. निलंबन मागे घेण्याचा ठराव विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाला आहे. हा विधानपरिषदेतील विषय आहे तो विधानसभेत आणण्याची गरज नाही. एकदा ठराव मंजूर झाला की तो परत वर्षभर आणता येत नाही, त्यामुळे निलंबन मागे घेता येणं शक्य नाही. 


सुनील प्रभू काय म्हणाले?


प्रशांत परिचारक यांना निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा. देशातील सैनिकांच्या पत्नींचा अपमान केला आहे. जवानांचा अपमान करणाऱ्या परिचारकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे सुनील प्रभू म्हणाले.