COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातली ही एक महत्त्वाची बातमी.  आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र पुढे येत आहे. विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही युती झाल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे पडद्यामागच्या युतीबाबत शिवसेना - भाजपकडून कोणीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नाही.


सत्तेचा खाऊ मिळून खाऊ


प्राप्त माहितीनुसार, 3 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेत. तर 3 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेत. तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे.