मुंबई: राज्यात स्थिर सरकार आणण्याच्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सरकार स्थापनेचा निर्णय हा राज्यपालांशी घटनात्मक तरतुदींवर चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. यावेळी भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारपरिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही. आम्हाला शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन करायचे आहे, त्यासाठी शिवसेनेसोबत काही स्तरांवर चर्चा सुरु आहे. मात्र, प्रसारमाध्यमांकडून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे शिवसेना आणि भाजपमधील चर्चा बंदच असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चर्चेची कोंडी तुम्ही निर्माण केली, आता तुम्हीच फोडा'


शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठणकावून सांगितले होते. यासंदर्भात बोलताना मुनगंटीवार यांनी म्हटले की, मी पहिल्या दिवसापासून तेच सांगत आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत. त्यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्रीपदी बसेल. तर उद्धव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 


तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं.... राऊतांचे आणखी एक ट्विट


तसेच संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे आम्ही चर्चेची कोंडी फोडायला तयार आहोत. वेळ पडल्यास मातोश्रीवर जाऊन चर्चा करण्यात आम्हाला कमीपणा वाटणार नाही. आतापर्यंत भाजपचे एकही पाऊल दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत गेलेले नाही. आमचं प्रत्येक पाऊल हे शिवसेनेशी युती करण्याच्यादृष्टीनेच टाकण्यात आले होते. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते गेल्या ३० वर्षांपासून एकत्र आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.