Maharashtra Politics : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडानंतर शिवसेना अॅक्शनमोडमध्ये आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गटनेतेपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर आता आणखी एका खासदाराची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं असून भावना गवळी यांना प्रतोद पदावरुन हटवण्याची विनंती केली आहे. 


भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


एकनाश शिंदे यांना दिला होता पाठिंबा
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठआकरे यांना पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं होतं. 


आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमत: हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा, ही विनंती", असं आवाहन भावना गवळी यांनी केलं होतं. 


भावना गवळींच्या निकटवर्तीयाला जामीन
वाशिमच्या खासदार भावना गवळी  यांचे निवटवर्तीय सहकारी सईद खान यांना कालच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मनी लॉण्ड्रिंगचे आरोप आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांतील घोटाळ्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) सईद खान (Saeed Khan) याला अटक केली होती.


खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ आणि वाशिम इथल्या पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते.