मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेने दाखल केली तक्रार
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑ़डिओ क्लिपप्रकरणी शिवसेनेनं आता मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. पालघरमधल्या निवडणूक यंत्रणेवर आपला विश्वास उरला नसल्यामुळे तिथे तक्रार करण्याऐवजी मुख्य निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार केल्याची माहिती शिवसेनेचे विधान परिषदेतले गटनेते अनिल परब यांनी दिलीय.
पालघरच्या पोटनिवडणूक प्रचारात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. अखेरच्या टप्प्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लीपवरुन दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळालं. ऑडिओ क्लिपचा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेलाय.
मुख्यमंत्र्यांकडून आता साम दाम दंड भेदचा अर्थ शिकू असं टोला उद्धव ठाकरेंनी लगावल्यावर आता मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केलाय.
साम दाम दंड भेदचा अर्थ गरज असेल तर शिकवू असं मुख्यमंत्री म्हणाले. झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.