मुंबई : सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यानं तर तरुणानांच नाही तर नेते मंडळींनाही वेड लावलं आहे. सोहळा कोणताही असो झिंगाट गाणं झालंच पाहिजे असा आग्रह लोकांचा असतोच असतो. लग्न असो किंवा हळद किंवा एखादा समारंभ झिंगाट गाण्याशिवाय तो अपूर्णच राहातो. आता चक्क मुंबईच्या महापौरांनाही झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झिंगाटच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जागृती मंच द्वारे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. 



या कार्यक्रमाच्या निमित्तानं खेळ पैठणीचा या महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येनं माहिलांनी भाग घेतला. या कार्यक्रमाची रंगत झिंगाट गाण्यानं वाढवली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. त्यानंतर कोळी गाण्यावरही त्यांनी डान्स केला. 


किशोरी पेडणेकर यांच्या डान्सच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. याआधी नवनीत राणा यांचा महिलांसोबत गेम खेळताना आणि धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता किशोरी पेडणेकर यांचीही चर्चा होत आहे.