मुंबई : Sanjay Raut will meet Congress leader Rahul Gandhi : देशातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत आज दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्याचवेळी ते प्रियंका गांधी यांनीही भेट घेणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही दिल्लीत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. (Shiv Sena leader Sanjay Raut will meet Congress leader Priyanka Gandhi and Rahul Gandhi, NCP will also Meeting in Delhi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत होणाऱ्या महत्वाची दोन घडामोडींमुळे देशाच्या राजकारणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर कोणत्याच आघाडीचा घटक नसलेला शिवसेना पक्ष लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडीत (UPA) दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.


दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यूपीएबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे राहुल गांधी यांना संजय राऊत सांगण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस तसेच शिवसेनेकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र चर्चा सुरु झाली आहे.



दुसरीकडे  दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे. दुपारी साडे तीन वाजता दिल्लीतल्या राष्ट्रवादी कार्यालयात ही बैठक होत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या महत्वाच्या दोन बैठकांत काय निर्णय होणार याचीच उत्सकता आहे.