औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलीय. 


मुख्यमंत्र्यांचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या खदान परिसरात कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेत. औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत औरंगाबादचा कचरा प्रश्न गुरुवारी मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय.


काय ठरलं बैठकीत?


राज्य सरकारने कचरा विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला आर्थिक मदत आणि जागा देण्याची मदत करावी, असं या बैठकीत ठरलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याची माहिती आदित्य यांनी दिलीय. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केली होती. 


शिवसेनेतच राजकारण तापलंय


औरंगाबाद प्रश्नावरून शिवसेनेतच राजकारण तापलंय. सत्तेत असताना शिवसेना-भाजप कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी लगावला. कचरा टाकण्यासाठी महापालिकेने जितक्या जागा शोधल्या त्या माझ्याच मतदार संघात होत्या. मात्र माझ्या मतदार संघात एक थेंबसुद्धा कचरा टाकू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी घेतलाय. त्याचबरोबर बाग़डे आणि रावसाहेब दानवे यांच्या राजकारणामुळे हा प्रश्न पेटल्याचा आरोपही त्यांनी केलाय.